
वाहन खरेदीसाठी अक्षय तृतीयाचा साधला मुहुर्त
नवी गाडी घरी नेण्याची लगबग
पुणे, ता. ३ : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर स्वतःची नवीन गाडी घरी घेऊन येण्यासाठी आठवडा भरापूर्वीच बाजारपेठेत खरेदी सुरू झाली होती. त्यामुळे आजचा मुहूर्त साधत वाहन घरी घेऊन जाण्याची लगबग आज दिसून आली.
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो. हाच मुहूर्त साधत २६ एप्रिल ते ३ मे या दरम्यान चार हजार ४४६ नवी वाहने दाखल झाली आहेत. तर मागच्या वर्षी कोरोनामुळे ७ मे ते १४ मे २०२१ या दरम्यान केवळ ४५२ वाहने दाखल होती. यंदाच्या सर्व प्रकारच्या वाहनानांच्या खरेदीची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) करण्यात आली आहे.
वाढत्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी च्या दरामध्ये सातत्याने होणारी दर वाढ नागरिकांसाठी मोठी डोके दुखी ठरत आहे. त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने बाजारात दाखल झाले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना देशभरातून समोर आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने या घटनांबाबत गंभीर पावले उचलत इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना नवीन मॉडेल (दुचाकी) लाँच करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिक या वाहनांच्या खरेदी बाबत संभ्रमात असल्याचे दिसून येतात. असे एका वाहन विक्रेत्याने सांगितले.
आरटीओकडे नोंदणी झालेली वाहने
गाडी प्रकार : एकूण नोंदी
दुचाकी : २६६८
चार चाकी : १६९७
माल वाहतूक वाहने : २१४
बस : ३८
रुग्णवाहिका : ३
रिक्षा : ४०
७ मे १४ मे २०२१ दरम्यान आरटीओकडे नोंदणी झालेली वाहने
गाडी प्रकार : एकूण नोंदी
दुचाकी : ७०
चार चाकी : २७७
माल वाहतूक वाहने : ९४
बस : ३
रुग्णवाहिका : ८
61684, 61620
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59761 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..