विद्यार्थ्यांसाठी काय पण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी काय पण!
विद्यार्थ्यांसाठी काय पण!

विद्यार्थ्यांसाठी काय पण!

sakal_logo
By

मीनाक्षी गुरव: सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ४ : विद्यार्थ्यांमध्ये सांकेतिक चिन्हे, आकृत्या, आकडेमोड यातील गंमतीद्वारे गणिताची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य डिजिटल ग्रंथालय स्वरूपात उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित होणे, यासाठी आता शालेय शिक्षण विभाग नामांकित संस्थांचे सहकार्य घेत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने याद्वारे एक पाऊल पुढे टाकले आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) नामांकित संस्थांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात काही प्रकल्प राज्यातील आदर्श शाळांमध्ये राबविण्यात येणार आहेत.

कशासाठी व काय?
*गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी*
- इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी
- सुधारणा करण्याचा उद्देश
- शालेय शिक्षण विभाग आणि खान ॲकॅडमी यांच्यात करार
- पहिल्या टप्प्यात राज्यातील ४८८ आदर्श शाळांमध्ये हा उपक्रम
- ॲकॅडमीतर्फे गणिताचे गुणवत्तापूर्ण व्हिडिओ, अन्य ई-साहित्य उपलब्ध करून दिले जाणार
- ॲकॅडमीमार्फत उपलब्ध होणारे जवळपास ७०० हून अधिक व्हिडिओ, लेख, सराव साहित्याचे मराठीमध्ये भाषांतर
- ते विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करणार

*डिजिटल ग्रंथालय*
- शालेय शिक्षण विभाग आणि पहिले अक्षर फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार
- राज्यातील ३६ आदर्श शाळांमध्ये डिजिटल ग्रंथालय साकारण्यात येणार
- नव्या स्वरूपाच्या अद्ययावत ग्रंथालयाचा लाभ जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांना घेता येणार
- सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाशी निगडित डिजिटल आशय पोचविण्यासाठी प्रयत्न
- त्यासाठी पहिले अक्षर फाउंडेशनकडून ‘एससीईआरटी’समवेत भागीदारी

*उद्योजकतेचे मार्गदर्शन*
- शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये नव उद्योजकता विकसित होण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न
- त्यासाठी इडल गिव्ह फाउंडेशनसमवेत करार
- या अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला
- ही व्याख्यानमाला ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार
- विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयक कौशल्ये विकसित व्हावी, हा उद्देश
......
विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचे सखोल ज्ञान वाढीस लागेल, गणिती आकडेमोड करताना विद्यार्थी वेग पकडू शकतील, यासाठी खान ॲकॅडमीसमवेत करार केला आहे. त्याशिवाय पहिले अक्षर फाउंडेशनला ३६ आदर्श शाळांमध्ये डिजिटल ग्रंथालय विकसित करण्याची जबाबदारी दिली आहे. तर शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित व्हावी, यासाठी इडल गिव्ह फाउंडेशनसमवेत करार केला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे.
- रमाकांत काठमोरे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59767 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top