‘पेडल मिशन’चा पर्यावरणपूरक उपक्रम ‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम ‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम ‘पेडल मिशन’ची अनोखा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पेडल मिशन’चा पर्यावरणपूरक उपक्रम
‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम
‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम
‘पेडल मिशन’ची अनोखा उपक्रम
‘पेडल मिशन’चा पर्यावरणपूरक उपक्रम ‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम ‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम ‘पेडल मिशन’ची अनोखा उपक्रम

‘पेडल मिशन’चा पर्यावरणपूरक उपक्रम ‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम ‘पेडल मिशन’चा अनोखा उपक्रम ‘पेडल मिशन’ची अनोखा उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : तुमच्या घरी सायकल आहे का? तिचा जर तुम्ही वापर करत नसाल व ती खराब झाल्यामुळे तुम्ही तिला भंगारात विकणार असाल तर जरा थांबा. कारण तुमची हीच सायकल कोणा गरजूंसाठी त्याचा प्रवास सुखकर करण्यास मदत करू शकते. अनेकांची गरज लक्षात घेत कोथरूडमधील आयडियल कॉलनीतील सायकल व्यावसायिक आनंद वाजपेयी यांनी ‘पेडल मिशन’ची अनोखी चळवळ सुरू केली आहे.
‘पेडल मिशन’मुळे समाजातील अनेक गरजू विद्यार्थी व नागरिक ज्यांना सायकल विकत घेता येत नाही त्यांना सहज सायकल उपलब्ध झाल्या आहेत. पेडल मिशनला एक वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून सायकल देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर नुकतेच पेण येथे ५६ तर, कळंब भागात २८ सायकल देण्यात आल्या आहेत.
याबाबत आनंद म्हणाले, ‘‘शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. छोट्या-मोठ्या कामांसाठी साधं घराजवळ जायचं असेल तरी देखील लोकं गाड्यांचा वापर करताना दिसतात आणि मग त्यांचीच तक्रार असते की, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढत आहे. प्रत्येकाला दररोज सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे शक्य होईलच असे नाही. त्यात कोरोनामुळे अद्याप आर्थिक गाडी रुळावर आली नाही. अशात पर्यावरण, वाहतुकीचा अत्यंत साधा पर्याय गरजू लोकांना उपलब्ध व्हावा यासाठी काही तरी करावे अशी कल्पना सुचली. त्यात एके दिवशी एक मुलगी आमच्याकडे जुनी व खराब सायकल घेऊन आली. ती सायकल विकून नवीन सायकल घ्यायची होती. मग तिला ही सायकल एखाद्या गरजूला दे, त्यासाठी सायकल दुरुस्त आम्ही करू असे सांगितले. त्यानंतर ‘पेडल मिशन’ची सुरवात झाली. यामध्ये लोकांकडून त्यांची जुन्या, वापर होत नसलेली किंवा खराब झालेली सायकल घेऊन व ती दुरुस्त करून गरजूंना मोफत देतो.’’

समाज माध्यम किंवा सायकल मोहिमांच्या माध्यमातून लोकांना जुन्या सायकली दान करण्याचे आवाहन करतो. वापरात नसलेल्या सायकली दान केल्याने गरजूंना मदत होतेच, पण त्यामुळे पर्यावरण रक्षणालाही मदत होते. स्वच्छ, हरित आणि सुंदर पर्यावरण हे येणाऱ्या पिढीचा अधिकार आहे, त्यासाठी आत्ताच पावले उचलणे गरजेचे आहे.
आनंद वाजपेयी.

हैदराबाद, गोव्यातही उपक्रम
सायकलचा वापर वाढविणे तसेच आपल्या या अनोख्या उपक्रमाची माहिती पोचविणे व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाजपेयी यांनी पुणे ते कन्याकुमारी अशी खास सायकल मोहीम केली. यामुळे हैदराबाद आणि गोव्यात ही ‘पेडल मिशन’ला सुरवात झाली. सायकलचा वापर जास्तीत जास्त व्हावा या अनुषंगाने हा या उपक्रमाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59768 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top