
अमली पदार्थ तस्कराकडून ११८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त
पुणे, ता. ३ : मुंबईहून पुण्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अमली पदार्थ तस्कराला अटक केली. "एटीएस''ने त्याच्याकडून बारा लाख रुपये किमतीचे ११८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी पोलिस हवालदार अशोक पेरणेकर यांनी "एटीएस''च्या मुंबईतील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महंमद फारुख महंमद उमर टाक (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी, मुंबई, मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील मालधक्का चौक रस्त्यावर एक व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ''एटीएस''च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार, एटीएसच्या पथकाने संबंधित व्यक्तीला पकडण्यासाठी मालधक्का चौकात सापळा रचला. त्यावेळी पथकाने त्याच्याकडून मेफेड्रोनसह मोबाईल, डिजिटल वजन काटा, अडीच हजार रुपये, आधारकार्ड, डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक संतोष सुबाळकर, सहायक निरीक्षक दत्तात्रेय दराडे, पोलिस नाईक गायकवाड, पोलिस हवालदार अशोक पेरणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विश्वास भास्कर करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59769 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..