एससीईआरटीतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एससीईआरटीतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा
एससीईआरटीतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा

एससीईआरटीतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : राज्यातील शिक्षकांमध्ये नवोपक्रम वृत्ती आणि चिकित्सक विचार कौशल्ये विकसित होऊन, त्याद्वारे ‘इन्स्पायर ॲवॉर्ड मानक योजनेमध्ये राज्यातील नवोपक्रमांचे प्रमाण वाढविणे, या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) वतीने ‘आय राइस’ या एकदिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
ही कार्यशाळा एससीईआरटीचा विज्ञान विभाग आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) यांच्या समन्वयाने घेण्यात आली. डाएट अधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हा प्रशिक्षण कार्यक्रम ब्लेंडेड स्वरूपाचा असून ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विज्ञान आणि गणित विषयांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी नियोजन यावेळी करण्यात आले. त्यानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर परिषदेमार्फत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील जिल्हा समन्वयक यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील ३३ वरिष्ठ अधिव्याख्याता आणि अधिव्याख्याता उपस्थित होते. विज्ञान विषयक विविध प्रयोग कृतीसह कृतीयुक्त अध्यापन पद्धतीने वर्ग अध्यापन कसे करता येईल, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणासाठी परिषदेचे संचालक एम. देवेंदर सिंह, सहसंचालक रमाकांत काठमोरे आणि उपसंचालक विकास गरड यांनी मार्गदर्शन केले. तसेच मयूर खैरे, शांती पिसे आणि ‘आयसर’चे अशोक रूपनेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘एससीईआरटी’च्या विज्ञान विभागाच्या उपविभागप्रमुख तेजस्विनी आळवेकर यांनी प्रास्ताविक केले. तर अधिव्याख्याता मनीषा ताठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59821 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top