टाटा मोटर्स कामगारांना वेतनवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा मोटर्स कामगारांना वेतनवाढ
टाटा मोटर्स कामगारांना वेतनवाढ

टाटा मोटर्स कामगारांना वेतनवाढ

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर व ईदच्या पार्श्‍वभूमीवर टाटा मोटर्स कंपनीत मंगळवारी (ता. ३) वेतनवाढ करार झाला. टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आर्थिक वर्ष सन २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीकरिता झालेल्या दीर्घकालीन वेतनविषयक करारावर व्यवस्थापन व कामगार संघटना अशा दोहोंकडून स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार कामगारांना १६ हजार ८०० रुपये वाम मिळणार आहे. करारानंतर कामगारांनी कंपनीत जल्लोष केला.
या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी, युनियन पदाधिकारी, प्रतिनिधी आणि बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते. वेतनवाढ करारात चार वर्षांच्या कालावधीत निश्चित वेतनवाढ १६ हजार ८०० रुपये विभागून देण्यात आली. उत्पादनक्षमतेचे मापन म्हणून ‘एचपीईव्ही’ या जागतिक परिमाणावर, गुणवत्तेचे मापन - डीआरआर आणि सक्रिय सुरक्षा मापदंड याच्यावर आधारित ''व्हेरिएबल पे'' योजना जाहीर केली.
ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष ए. बी. लाल म्हणाले की, ''मी व्यवस्थापन आणि युनियन या दोन्ही कमिटीचे दीर्घकालीन वेतनविषयक करार वेळेवर आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करतो. या करारामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मी पुणे प्लांटला सर्वतोपरी यश चितंतो आणि अनेक वर्षांपासून निर्माण झालेले परस्पर सहकार्य आणि विश्वासाचे संबंध दृढ करण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा देतो.
युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले की, ''हा वेतनविषयक करार सर्वांसाठी आशादायी आहे. युनियन आणि कामगार खूप आनंदी आहेत. टाटा मोटर्सचे नेतृत्वाचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी दोघेही कठोर परिश्रमाचे योगदान सतत चालु ठेवतील.’

61791

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59831 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top