
नवनिर्वाचित न्यायाधीशांचा पीबीएतर्फे सन्मान
पुणे, ता. ४ : प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तरपदी निवड झालेल्या नवनिर्वाचित न्यायाधीशांचा पुणे बार असोसिएशन (पीबीए) तर्फे सन्मान करण्यात आला. लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. प्रताप परदेशी यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
२०२० मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परीक्षेतील यशस्वी ५५ उमेदवार, आतापर्यंत ५०० हून अधिक जणांना न्यायाधीश होण्यास मार्गदर्शन करणारे ॲड. गणेश शिरसाट आणि अपघातग्रस्त आठ वर्षाच्या चिमुकलीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोहोचविणारे पोलिस नाईक समीर बागसीराज, पोलिस निरीक्षक बापू शिंदे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मैथिली मर्ढेकर, स्नेहा देशपांडे, मंजुश्री चव्हाण, इशा घाटे, सायली लंबाते, रवी काळे, अमोल भोसेकर, शुभदा सुक्रे, शहनवाज पठाण, कृष्णा लटके, प्रियांका शिंदे, हनी पटेल, महेश भडक, माधुरी चौधरी, नम्रता शितोळे, ओंकार शास्त्री आदी नवनिर्वाचित न्यायाधीशांचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख आणि पीबीएचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, ॲड. लक्ष्मण येळेपाटील, सचिव ॲड. अमोल शितोळे, ॲड. सुरेखा भोसले, हिशेब तपासणीस ॲड. शिल्पा कदम आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59850 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..