मुस्लिम वकील असोसिएशनतर्फे प्रथमवर्ग न्यायाधीशांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्लिम वकील असोसिएशनतर्फे प्रथमवर्ग न्यायाधीशांचा सत्कार
मुस्लिम वकील असोसिएशनतर्फे प्रथमवर्ग न्यायाधीशांचा सत्कार

मुस्लिम वकील असोसिएशनतर्फे प्रथमवर्ग न्यायाधीशांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : कोरोना काळात निधन पावलेल्या वकिलांना पुणे जिल्हा मुस्लिम वकील असोसिएशनतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी सामुहिक प्रार्थना केली गेली. त्याचप्रमाणे राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा राहावा, सौहार्दाचे वातावरण बिघडू नये, यासाठी दुवा मागण्यात आली. या वेळी नव्याने नियुक्त झालेल्या प्रथमवर्ग न्यायाधीशांचा सत्कार तसेच मान्यवर वकिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड. अहमदखान हाजी उस्मानखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास काँग्रेस पार्टी लीगल सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. शाहीद अख्तर, ॲड. समीर शेख, ॲड. जहीर खान, अहमद खान पठाण, ॲड. आयुब शेख, ॲड. आर. के. सय्यद, ॲड. रुखसाना शेख, ॲड. फेहमिना शेख, ॲड. डॉ. नाझिया तलफदार पठाण, ॲड. शहेजादी सय्यद, ॲड. फैयाज शेख, ॲड. साबीर खान आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59851 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top