माजी सैनिकांना मिळणार लष्करी रुग्णालयात उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी सैनिकांना मिळणार लष्करी रुग्णालयात उपचार
माजी सैनिकांना मिळणार लष्करी रुग्णालयात उपचार

माजी सैनिकांना मिळणार लष्करी रुग्णालयात उपचार

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः माजी सैनिक व माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजनेचे (इसीएचएस) लाभार्थ्यांना आता अत्यावश्‍यक परिस्थितीमध्ये लष्करी रुग्णालयात उपचार दिले जाणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही लष्करी रुग्णालयाला आपत्कालीन किंवा आरोग्याच्या तक्रारीमुळे जिवाचा धोका निर्माण होईल अशा परिस्थितीमध्ये माजी सैनिक किंवा इसीएचएस लाभार्थ्यांना उपचारासाठी नकार देता येणार नाही.
संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी वैद्यकीय सेवा महासंचालनालयाच्या (डीजीएमएस) वतीने याबाबत नुकत्याच सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार माजी सैनिकांच्या आरोग्याची काळजी हे लष्कराच्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील कार्यांपैकी एक भाग असल्याचे नमूद करण्यात आले.
इसीएचएस पॉलिक्लिनिकमध्ये औषधांची अनुपलब्धता, वेळ अशा कारणांमुळे काही वेळा माजी सैनिक व इसीएचएस लाभार्थ्यांना समस्या निर्माण होतात. या सर्व गोष्टींचा आढावा घेत डीजीएमएसतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपचार दिल्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यावर जेव्हा माजी सैनिक किंवा इसीएचएस लाभार्थ्याला संबंधित इसीएचएसच्या इम्पॅनल्ड हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचे निर्देश मिळताच त्या रुग्णाला सर्व प्रकारची मदत लष्करी रुग्णालयाद्वारे पुरवली जाईल. यामध्ये इम्पॅनल्ड हॉस्पिटलशी संपर्क साधणे, बेडची उपलब्धता, रुग्णवाहिका सेवा आदींची माहिती रुग्णाच्या नातेवाइकांना किंवा कुटुंबीयांना लष्करी रुग्णालयाद्वारे दिले जाईल.
जोपर्यंत या रुग्णांना माजी इसीएचएसच्या इम्पॅनल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात नाही, तोपर्यंत लष्करी रुग्णालयाद्वारे त्यांना उपचारसेवा पुरवली जाणार आहे. तसेच अशा प्रकरणांची नोंद ठेवण्याचे ही निर्देश आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची निरीक्षणे लष्करी रुग्णालयाच्या प्रमुखाद्वारे केली जाईल.

‘‘या निर्णयामुळे माजी सैनिकांचा फायदा होत आहे. बऱ्याचदा इसीएचएस पॉलिक्लिनिक हे लांब ठिकाणी असतात किंवा सर्व प्रकारचे डॉक्टर्स असतील असे नाही. काही वेळा माजी सैनिक किंवा इसीएचएस सदस्य हे दुसऱ्या शहरात असताना देखील आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी त्यांना त्या भागातील पॉलिक्लिनिक शोधणे ही पण समस्या आहे. त्यात इसीएचएस पॉलिक्लिनिकच्या वेळा ठरलेल्या असल्यामुळे रात्री अपरात्री आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवल्यास लष्करी रुग्णालयात माजी सैनिकांना किंवा इसीएसएच लाभार्थ्यांना वेळेत उपचार मिळतील.
- मेजर मिलिंद तुंगार (निवृत्त)

या परिस्थितीत लष्करी रुग्णालयांकडे धाव :
- इसीएचएस पॉलिक्लिनिक लांब
- अत्यावश्‍यक परिस्थितीमध्ये नजीकच्या पर्यायाला प्राधान्य
- काहींना इसीएचएस पॉलिक्लिनिक शोधण्यास अडचणी
- इसीएचएस पॉलिक्लिनिकच्या ठरलेल्या वेळा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59853 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top