स्वतः बनवा चार धमाल रोबोट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वतः बनवा चार धमाल रोबोट्स
स्वतः बनवा चार धमाल रोबोट्स

स्वतः बनवा चार धमाल रोबोट्स

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः कुतूहल-संडे सायन्स स्कूल व सकाळ माध्यम समूह गेली १२ वर्षे मुलांनी प्रयोगातून विज्ञान-तंत्रज्ञान शिकावे यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. प्रयोगांचा आनंद आणि विषयांचे आकलन अशा दोन्ही गोष्टी मुलांना सहजपणे देणारे वार्षिक उपक्रम आणि सुट्ट्यांमधील विज्ञान व रोबोटिक्स विषयांच्या कार्यशाळा मुलांना नेहमीच आवडलेल्या आहेत.
१० ते १३ मे या कालावधीमध्ये चार दिवसांची चार रोबोट्स स्वतः बनविण्याची कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली आहे. रोबोटिक्स हा विषय सर्वांच्याच आकर्षणाचा आणि कुतूहलाचा असतो. रोबोटिक्स विषय शिकण्याची सुरुवात स्वतःच्या हाताने विविध रोबोट्स बनवून करणे मुलांना नक्कीच आवडेल. यासाठीच या चार दिवसीय रोबोटिक्स विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये रोबोटचे तंत्र, प्रकार व उपयोजन आदी मूलभूत संकल्पना समजून घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे चार रोबोट्स बनविणार आहे. मोटारच्या मदतीने चालणारा बगबॉट, चित्र काढणारा ड्रॉबॉट, सूर्याच्या ऊर्जेवर चालणारा क्रोकबॉट आणि आवाजाचा इलेक्ट्रॉनिक सेन्सर असणारा क्लॅपबॉट असे चार रोबोट प्रत्येक सहभागी विद्यार्थी तयार करणार आहे. रोबोट्स बनविण्याची ही कार्यशाळा ऑफलाइन पद्धतीने पुणे व पीसीएमसीमध्ये सहा ठिकाणी किंवा ऑनलाइन पद्धतीने घरी किट्स येऊन व्हिडिओ व मिटींग्सच्या मदतीने देखील करता येणार आहे.
या दोन्ही उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थी घरातूनच व्हिडिओ पाहून पालकांच्या मदतीने हे सर्व प्रयोग अथवा रोबोट्स करतील तर मोठी मुले प्रत्यक्ष येऊन कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील. शेवटी सर्वांना प्रमाणपत्र दिले जाईल. या कार्यशाळांमधून प्रत्यक्ष काहीतरी बनविण्याची गंमत मुलांना अनुभवता येईल, विषयांचे नीट आकलन होईल व नवनिर्मितीचा आनंद मिळेल.

कार्यशाळेविषयी
वयोगट - पहिली व दुसरी ऑनलाइन पद्धतीने व पुढील सर्व प्रत्यक्ष येऊन किंवा ऑनलाइन
कालावधी - १० मे ते १३ मे - रोज २ तास
शुल्क - २२०० रुपये (सर्व साहित्यासह)
प्रवेशाची अंतिम तारीख - ०७ मे २०२२
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी फोन अथवा व्हॉट्सॲप ८७७९६७८७०९, ९३७३०३५३६९, ९८५००४७९३३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59910 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top