पुलगेट-हडपसर दरम्यान मेट्रोचा अहवाल देण्याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलगेट-हडपसर दरम्यान मेट्रोचा अहवाल देण्याच्या सूचना
पुलगेट-हडपसर दरम्यान मेट्रोचा अहवाल देण्याच्या सूचना

पुलगेट-हडपसर दरम्यान मेट्रोचा अहवाल देण्याच्या सूचना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ४ : पुलगेट ते हडपसर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यता अहवाल सादर करावा. त्यानंतर हा मार्ग कोणी करावा, यावर निर्णय घेण्यात येईल असे बुधवारी ‘पुमटा’ (पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) च्या बैठकीत ठरले.
शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे. पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाचा लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. तर खडकवासला ते खराडी २८ किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर, तर एक फाटा सासवड रस्ता असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुमटा’ची बैठक झाली. या बैठकीला पीएमआरडीए. महामेट्रो, वाहतूक पोलिस, पीएमपी, जिल्हा प्रशासनासह विविध खात्याचे अधिकार उपस्थित होते. त्यामध्ये पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल पीएमआरडीए आणि महामेट्रोने तयार करावा. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा, असे ठरले.


महामेट्रो, पीएमआरडीएचे म्हणणे
माण या ठिकाणी मेट्रोसाठी कारडेपो आहे. तसेच लोणीकाळभोर या ठिकाणी देखील मेट्रोच्या कार डेपोसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर हा या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीएमआरडीएची आहे. तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यान मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.

प्रस्तावित मार्ग -
महामेट्रो - खडकवासला-स्वारगेट-पुलगेट- हडपसर फाटा (मगरपट्टासिटी) ते खराडी. (सुमारे २८ किलोमीटर)

पीएमआरडीए - शिवाजीनगर-पुलगेट-हडपसर ते लोणीकाळभोर. (१९ किलोमीटर)

एकत्रित मार्ग - पुलगेट ते हडपसर (८ किलोमीटर)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59916 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top