चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

येत्या आठवड्यात चुकवू नये असे सांस्कृतिक कार्यक्रम

१) श्रीराम करुणालहरी :
गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे यांच्या अजोड कलाकृतींवर आधारित ‘श्रीराम करुणालहरी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे निरूपण डॉ. शंकर अभ्यंकर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना पंडित वझेबुवा यांच्या नातसून लीनता वझे यांची असून मिलिंद गुणे यांनी या रचनांना स्वरसाज चढविला आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांच्यासह युवा पिढीतील गायक जयदीप वैद्य, श्रुती वझे, शर्वरी वैद्य हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत.
कधी : गुरुवार (ता. ५ मे)
केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
कुठे : एमईएस बालशिक्षण मंडळाचे सभागृह, मयूर कॉलनी

२) चित्र प्रदर्शन :
तेजश्री क्रिएशन्सतर्फे ‘क्रिएटिव किड्स अँड युथ्स -२०२२’ या बाल आणि युवा चित्रकारांसाठी राष्ट्रीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ५८ बालचित्रकारांच्या कलाकृती यात रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
कधी : शुक्रवार ते रविवार, (ता. ६ ते ८ मे)
केव्हा : सकाळी १० ते रात्री ८
कुठे : भारतरत्न भीमसेन जोशी कलादालन, सहकारनगर

३) भीमसेन वाणी :
संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या संतरचनांवर आधारित ‘भीमसेन वाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंजूषा पाटील, सौरभ नाईक, जयतीर्थ मेवुंडी हे प्रख्यात शास्त्रीय गायक यात सहभागी होणार आहेत.
कधी : गुरुवारी (ता. ५)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कुठे : ओंकारेश्वर मंदिर पटांगण, शनिवार पेठ

४) ‘सृजन’ प्रदर्शन :
सिंबायोसिस स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्टस अँड फोटोग्राफी स्कूल यांच्यातर्फे ‘सृजन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या छायाचित्रविषयक कलागुणांना वाव देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कधी : सोमवार व मंगळवार (ता. ९ व १०)
केव्हा : सकाळी ९ ते सांयकाळी ७
कुठे : राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता

५) ओडिसी नृत्य कार्यक्रम :
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘तारीझम, मुंबई’ प्रस्तुत ‘मुहूर्ते जीबना’ हा ओडिसी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. नृत्यगुरु स्तुती साहू आणि रसिका गुमास्ते यांच्या एकूण २५ शिष्या ओडिसी नृत्य सादर करणार आहेत.
कधी : रविवार (ता. ८)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कुठे : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता

६) अद्वैत सुरावली :
आदि शंकराचार्य यांनी रचलेल्या स्तोत्रांना रागांचा स्वरसाज चढवत सादर करण्यात येणाऱ्या ‘अद्वैत सुरावली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वृंदा शिंगणापूरकर आणि शर्वरी लेले हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महा-गणेश पंचरत्न, शिवमानस पूजा, पांडुरंगाष्टक, गोविंदाष्टक आदी स्तोत्रांची भैरव, शंकरा, यमन आदी रागांमध्ये बांधणी करण्यात आली आहे.
कधी : शुक्रवार (ता. ६)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कुठे : बेडेकर गणपती मंदिर, कोथरुड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59926 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top