‘सीईटी’ परीक्षांच्या नोंदणीस ११ मेपर्यंत मिळाली मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सीईटी’ परीक्षांच्या नोंदणीस ११ मेपर्यंत मिळाली मुदतवाढ
‘सीईटी’ परीक्षांच्या नोंदणीस ११ मेपर्यंत मिळाली मुदतवाढ

‘सीईटी’ परीक्षांच्या नोंदणीस ११ मेपर्यंत मिळाली मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : तुम्ही स्वत: किंवा तुमच्या घरातील कोणी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेची तयारी करत आहेत का? असेल तर मग हे आवर्जून इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. त्याप्रमाणे ‘सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस सीईटी, एमसीए सीईटी, एम. आर्क सीईटी, एम. एचएमसीटी सीईटी या सामाईक प्रवेश परीक्षांकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार करण्यात येत होती. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, या पुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.


‘सीईटी’ परीक्षांचे नाव : ऑनलाइन नोंदणीसाठी दिलेली मुदतवाढ
- एमएचटी सीईटी, एमबीए/एमएमएस सीईटी, एमसीए सीईटी, एम. आर्च सीईटी, एम. एचएमसीटी : ११ मे २०२२ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59935 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top