
‘सॅमसंग’ची लिडरशिप मार्चमध्ये झाली प्रबळ
पुणे, ता. ४ ः सॅमसंग या स्मार्टफोन ब्रॅण्डने मार्च महिन्यामध्ये त्यांच्या स्मार्टफोन बिझनेस लीडरशीपला प्रबळ केले आहे. पहिल्या तिमाहीमध्ये (जानेवारी-मार्च २०२२) सॅमसंगच्या स्मार्टफोन व्यवसायाने गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत ९ टक्के मूल्य वाढीची नोंद केली.
‘सॅमसंगमध्ये आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ग्राहकांना प्राधान्य देतो. आमचे नवीन लाँच-प्रमुख गॅलॅक्सी एस२२ सिरीज आणि गॅलॅक्सी ए सिरीजला ग्राहकांकडून मोठी मागणी मिळाली आहे, ज्यामुळे मार्च आमच्यासाठी विक्रमी महिना ठरला आहे,’’ असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन म्हणाले.
‘‘काऊंटरपॉइण्ट रिसर्च मंथली इंडिया स्मार्टफोन ट्रॅकरच्या मते, सॅमसंग मार्च २०२२ मध्ये २२ टक्के शिपमेंट आकारमान आणि २७ टक्के महसूल शेअर संपादित करत भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत अग्रस्थानी राहिली. संपूर्ण उद्योगाला पुरवठ्यासंदर्भात अडथळ्यांचा सामना करावा लागत असताना ही वाढ प्रशंसनीय आहे. सॅमसंगने अग्रस्थान कायम ठेवण्यासोबत त्यामधून ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रबळ गती राखली आहे,’’ असे काऊंटरपॉइण्टच्या रिसर्चचे उपाध्यक्ष नील शाह म्हणाले.
गॅलॅक्सी एस२२ सिरीज लाँचच्या महिन्याभरातच देशातील सॅमसंगचा सर्वाधिक विक्री होणारी प्रमुख स्मार्टफोन सिरीज झाली आहे. गॅलॅक्सी एस२२ अल्ट्रामध्ये नोट सिरीजची अद्वितीय क्षमता आणि एस-पेनसह एस सिरीजचा प्रो-ग्रेड कॅमेरा व कार्यक्षमतेचे संयोजन आहे. विक्रमी प्री-बुकिंगनंतर सॅमसंग २०२२च्या पहिल्या सहामाहीमध्ये भारतातील प्रिमिअम विभागामधील त्यांचे बाजारपेठ अग्रस्थान अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न करत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59988 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..