‘लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठीत कमी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठीत कमी’
‘लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठीत कमी’

‘लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठीत कमी’

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः ‘लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठी साहित्यात अभावाने दिसते, अशा प्रकारचे नाजूक विषय हाताळणे आणि पुरुष वेश्या हा मराठी कादंबरीचा नायक होणे हे क्रांतिकारी आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नुकतेच केले.

फोरसाईट फाउंडेशन आणि चेतक बुक्स यांच्यातर्फे ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी खरात यांच्या ‘जिगोलो’ कादंबरीचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दैनिक ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, चेतक बुक्सचे कुणाल हजारी, सुधीर भोंगळे आदी उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिनकर खरात यांनी आभार मानले.
--------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60006 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top