अभिनव चौकातील (नळस्टॉप चौक) वाहतुक कोंडीबाबत उपस्थित करण्यात केलेले प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनव चौकातील (नळस्टॉप चौक) वाहतुक कोंडीबाबत उपस्थित करण्यात केलेले प्रश्‍न
अभिनव चौकातील (नळस्टॉप चौक) वाहतुक कोंडीबाबत उपस्थित करण्यात केलेले प्रश्‍न

अभिनव चौकातील (नळस्टॉप चौक) वाहतुक कोंडीबाबत उपस्थित करण्यात केलेले प्रश्‍न

sakal_logo
By

अभिनव चौकातील (नळस्टॉप चौक) वाहतूक कोंडीबाबत उपस्थित करण्यात केलेले प्रश्‍न

- दुहेरी उड्डाणपुलाचा पर्याय सुचविणाऱ्या सल्लागारांना वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल, याचा अंदाज आला नाही का ?
- बांधताना नियमानुसार सात मीटर रस्ता ठेवण्याबाबत आश्‍वासन दिले, प्रत्यक्षात तीन मीटरच रस्ता शिल्लक राहिला. हा सात मीटर रस्त्याचा नियम गेला कुठे ?
- अंतर्गत रस्त्यांवरील बोलार्डस्‌मुळे नळस्टॉप परिसरातील पाच ते दहा हजार नागरिकांची चारचाकी वाहने जाणार कुठून?
- नळस्टॉप चौक ते लागू बंधू पर्यंतच्या रस्त्यात बस किंवा मोठे वाहन बंद पडल्यास वाहतूक कोंडी फोडणार कशी?
- जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यानंतर विद्यार्थी, पालकांसाठी बसथांब्याची सोय काय? रस्ता ओलांडायचा कसा?
- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावरील पदपथच काढून टाकल्यावर पादचाऱ्यांनी चालायचे कुठून?
- दुहेरी उड्डाणपुलामुळे बसथांबे स्थलांतरित करताय, पण प्रवाशांचा कोणी विचार करणार आहे का?
- नदी पात्रातील रजपूत वीटभट्टी झोपडपट्टीजवळील प्रस्तावित डीपी रस्त्याला मुहूर्त केव्हा लागणार?
- नदीपात्रातून महामेट्रोच्या पुलांना परवानगी मिळत असेल, तर डीपी रस्त्याला का नाही?
- नदीपात्रातील डीपी रस्त्याबाबत महापालिकेने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये बाजू व्यवस्थितपणे का मांडली नाही?
- विधी महाविद्यालय रस्ता आठवले चौकापर्यंत दुहेरी केल्यास स्थानिक नागरीकांनी रस्ता ओलांडायचा कसा?
- शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नळस्टॉप चौकाजवळील भुयारी मार्गाचे काम केव्हा सुरु होणार?
- ‘पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पा’ अंतर्गतचे मोठे पदपथ करण्याचे प्रकार थांबविणार कधी?
- स्थानिक नागरीकांना येणाऱ्या अडचणींकडे महापालिका, वाहतूक पोलिस लक्ष देणार आहेत का?
- मेट्रो प्रकल्पाला जोडण्यासाठी बससाठी जागा आहे का? बस वाहतुकीची व्यवस्था तीन मीटर रुंदीच्या रस्त्यावर होणार का?

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60010 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top