
कोथरूड उड्डाणपूलाची कोंडी
काय आहेत लोकांची मते
१. म्हात्रे पुलाला डीपी रस्ता जोडला गेला पाहिजे.
२. नळ स्टॉप चौकातील उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. तो तत्काळ पाडून टाकला पाहिजे.
३. नळ स्टॉप चौकात भुयारी मार्ग बांधण्यात यावा.
४. पर्यावरण वादी कार्यकर्ते बरोबर चर्चा करावी. गोखले नगर व एमआयटीचा मार्ग काढावा. नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन लोक प्रतिनिधींनी कामे केली पाहिजेत.
६. पौड फाटा व बालभारती रस्ता मार्गावर भुयारी रस्ता तयार करणे.
७. नळ स्टॉप चौकातला उड्डाणपूल हा सावरकर उड्डाणपुलाला जोडणे आवश्यक आहे.
८. नदीपात्रातील रस्ता डीपी रस्त्याला जोडावा
९. आठवले चौक ते एसएनडीटी गेट रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु करणे.
१०. दुहेरी पूल खंडोजी बाबा चौक इथंपर्यंत घेऊन जाणे.
११. सध्याच्या उड्डाणपूल खाली पे अँड पार्क सुरु करणे.
१२. कर्वे रस्त्यांवर व्यापाऱ्यांना पार्किंग हवी.
१३. जड वाहनांसाठी वेळ निश्चित झाला पाहिजे.
१४. उड्डाणपूल मुळे रस्ता अरुंद झाला आहे.तो रुंद झाला पाहिजे.
१६. कर्वे रस्त्यांवर लावण्यात आलेले बोलार्ड काढून तिथून दुचाकी जाण्यास परवानगी द्यावी.
१७. चक्राकार वाहतूक पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे.
१८. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. दुचाकीची संख्या कमी करण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यावर मोफत बस सेवा जरी सुरु केली तर उद्याची गुंतवणूक ठरेल.
१९. उड्डाणपुलामुळे बस स्टॉप स्किप करावे लागत आहे. बसस्टॉप नाहीसे झाल्याने प्रवासी प्रवासासाठी अन्य साधनांचा वापर करतात.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60018 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..