शिखरबंद मंदिराचे कोथरूडला लोकार्पण शिखरबंद मंदिराचे कोथरूडला अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिखरबंद मंदिराचे कोथरूडला लोकार्पण
शिखरबंद मंदिराचे कोथरूडला अनावरण
शिखरबंद मंदिराचे कोथरूडला लोकार्पण शिखरबंद मंदिराचे कोथरूडला अनावरण

शिखरबंद मंदिराचे कोथरूडला लोकार्पण शिखरबंद मंदिराचे कोथरूडला अनावरण

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : ''''विविध जाती-धर्म, समाज, संप्रदाय, संस्कृतीने गुंफलेल्या माळेने भारतमाता अलंकृत आहे. श्री गौड ब्राह्मण समाज याच माळेतील एक महत्त्वाचे फूल असून, हिंदुत्वाचा अंश आहे. समाजात भावभक्ती, एकोपा, सात्त्विक वृद्धी, तसेच भारतमातेचा उत्कर्ष व्हावा, यासाठी श्री गौड ब्राह्मण समाजाने योगदान द्यावे'''' असे मत अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
कोथरूड येथे श्री गौड ब्राह्मण समाजाच्या पहिल्या शिखरबंद मंदिराचे लोकार्पण आणि श्रीचारभुजा नाथाची प्राणप्रतिष्ठा गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी दत्तसेवा मंडळ व कर्मयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगीराज परांडे, स्वामी स्वरूपानंद, महंत श्री आनंदपुरीजी महाराज, सद्गुरू नंदानंदजी महाराज, योगीराज ब्रह्मचारी अवधेश चैतन्यजी महाराज, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांनी आशीर्वाद दिले. श्री गौड ब्राह्मण समाज चतुःशृंगी मंडळाचे अध्यक्ष भवरलाल धर्मावत, कार्याध्यक्ष राकेश शर्मा उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर आदींनी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60034 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top