‘इमऑए’ प्रकल्पास प्रथम क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इमऑए’ प्रकल्पास प्रथम क्रमांक
‘इमऑए’ प्रकल्पास प्रथम क्रमांक

‘इमऑए’ प्रकल्पास प्रथम क्रमांक

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीतर्फे आयोजित प्रादेशिक स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत ‘इएलइएसपीए मल्टीरोल ऑटोमेटेड एचइव्ही’ प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकविला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. या अंतर्गत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र आणि एमसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली होती. यात एकूण ११५ प्रकल्पांची प्रात्यक्षिक आणि स्पर्धेसाठी नोंदणी झाली. प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी उद्योग, संशोधन प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील २४  तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, सुरेश शिंदे, प्राचार्य डॉ. पी. बी. माने आणि समन्वयक डॉ. व्ही. के. बैरागी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60101 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top