
ललित कला केंद्राला दुर्मिळ पुस्तकांची भेट
पुणे, ता. ः संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ग्रंथसंग्रहातील ललित कलाविषयक पुस्तकांची भेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला विभागाला मिळाली आहे. डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्राच्या वतीने देण्यात आलेली ही भेट कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्वीकारली आहे.
डॉ. ढेरे हे मुख्यतः संतवाङ्मय आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे संशोधक-अभ्यासक म्हणून ओळखले जातात. डॉ. ढेरे यांनी याच मर्मदृष्टीने जमा केलेली, मुख्यतः नाट्य आणि संगीतविषयक पुस्तके आता विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात समाविष्ट होत आहेत. भारतीय नाट्याचे स्वरूप आणि परंपरा, बंगाली, गुजराती, तमीळ, कानडी रंगभूमी, प्राचीन भारतीय नाटक, धर्मपरंपरा आणि नाटक यांच्याविषयीचे ग्रंथ तर या संग्रहात आहेतच, त्याशिवाय किर्लोस्कर-देवलांपासून दलित रंगभूमीपर्यंतची मराठी नाट्यसृष्टी, मराठी नाटककार आणि मराठी नाटकांचाही त्यात समावेश आहे, या संग्रहात प्राचीन भारतीय नाटकांचा ग्रीक रंगभूमीशी असलेला संबंध, विसाव्या शतकातली अमेरिकन रंगभूमी, रशियन रंगभूमी आणि स्टॅनिस्लावस्की ते पीटर बुक अशा प्रायोगिक रंगभूमीवरची पुस्तके या संग्रहात असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60105 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..