सिंहगड रस्ता, धानोरी, विमाननगरचा पाणी पुरवठा आज बंद राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड रस्ता, धानोरी, विमाननगरचा पाणी पुरवठा आज बंद राहणार
सिंहगड रस्ता, धानोरी, विमाननगरचा पाणी पुरवठा आज बंद राहणार

सिंहगड रस्ता, धानोरी, विमाननगरचा पाणी पुरवठा आज बंद राहणार

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : वडगाव जलकेंद्र, विमाननगर व धानोरी टाकीवर अवलंबून असणाऱ्या भागात विद्युत आणि पंपिंग, स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा उद्या (ता. ५) बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग ः वडगाव जलकेंद्र परिसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक इत्यादी.
भामा आसखेड प्रकल्प : विमाननगर टाकी परिसर, संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एसआरए भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, दत्त मंदिर परिसर इ.
धानोरी टाकी परिसर : कमल पार्क, माधवनगर, धानोरी गावठाण, परांडेनगर, लक्ष्मीनगर, गोकुळनगर, भैरवनगर, काशिनाथनगर, आनंद पार्क, श्रमिकनगर, सिद्धार्थनगर, सुदामानगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क.

जनसंपर्क विभागाचा ढिसाळ कारभार
शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सोमवारी (ता. २) जनसंपर्क विभागाला अधिकृत कळविले होते. पण, जनसंपर्क विभागाने ही माहिती बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे पाणी बंद असल्याची पूर्वसूचना नागरिकांना उशिरा मिळाली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60142 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top