
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राजक्ता काळे यांना प्रदान
पुणे, ता. ४ : राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे दिला जाणारा ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यातील आंतरराष्ट्रीय बोन्साय मास्टर डॉ. प्राजक्ता काळे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान सोहळा नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याच्या मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. डॉ. काळे यांनी बोन्साय कलेबद्दल जाणून घेण्यासाठी पुस्तके लिहिली आहेत. बोन्साय मास्टर म्हणून, त्यांनी जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे, आणि अनेक आंतरराष्ट्रीय बोन्साय संस्थांनी त्यांना विशेष कामगिरी व अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
62030, 62029
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60159 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..