भोंगाप्रकरणी २९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंगाप्रकरणी २९२  जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
भोंगाप्रकरणी २९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

भोंगाप्रकरणी २९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे चार एप्रिलपर्यंत उतरविण्याबाबत दिलेल्या आदेशानंतर बुधवारी शहरामध्ये तीन ते चार ठिकाणी ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी २९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही.

ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे चार एप्रिलपर्यंत न उतरविल्यास तेथे हनुमान चालिसा पठण करा, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर रमझान ईदपासूनच शहरात पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेषतः पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, यादृष्टीने बैठका घेऊन संबंधितांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, मंगळवारपासूनच ‘मनसे’च्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या.

दरम्यान, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत नारायण पेठेतील खालकर चौकामध्ये ‘मनसे’ने महाआरतीचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ‘मनसे’चे अजय शिंदे यांच्यासह अकरा जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले. त्याचबरोबर अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करिष्मा चौकातील हेमंत संभूस यांच्यासह १० ते १२ जणांना, फरासखाना पोलिसांनी रविवार पेठेतील बंदिवान हनुमान मंदिर येथे प्रशांत कनोजिया यांच्यासह ४ जणांना, वारजे माळवाडी येथे कैलास दांगट यांच्यासह १० जणांना, तर कोंढवा येथे ‘मनसे’चे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या निवासस्थानासमोर अमोल शिरस, रोहन गायकवाड, अमित जगताप व गणेश बाबर यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
--------
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना केल्या आहेत. बुधवारी सकाळी ध्वनिवर्धकावर अजान झालेली नाही. शहरात कोणी ठरवून अनुचित प्रकार घडवू इच्छित असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त
---------------
फोटो नं - 61949

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60174 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top