कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे!
कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे!

कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे!

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः कोथरूडकरांच्यादृष्टीने जिव्हाळ्याच्या बनलेल्या नळ स्टॉप ते अभिनव चौक दुहेरी उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनानंतर गेले दोन महिने होत असलेल्या वाहतूक कोंडीबद्दल ‘सकाळ’च्या पुढाकाराने बुधवारी सर्व संबंधित घटकांची बैठक झाली.
पायाभूत अडचणींचा विकास होत असताना निर्माण होणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्याची भूमिकेतून आयोजित या बैठकीत नागरी संघटना, पुणे महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस, व्यापारी संघटना, उद्योजक, वाहतूक तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले. मेट्रो, उड्डाणपुलामुळे अरुंद झालेला कर्वे रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त व्हावा, यासाठी बैठकीत सूचनांचा पाऊस पडला; उड्डाणपुलाबाबत आक्षेपही घेतले गेले. बॅरिकेडिंग, एकदिशा मार्ग, लगतचे रस्ते, वाहतूक पोलिसांची अधिकची संख्या अशा अनेक पर्यायांवर बैठकीत चर्चा झाली. एका रात्रीत वाहतुकीचा प्रश्न सुटण्याची व्यवहार्य शक्यता नसली, तरी कोंडी सुटण्याच्यादृष्टीने पावले उचलण्याचे बैठकीत निश्चित झाले.
सकाळी अकरा ते बारा या वेळेत आणि संध्याकाळी साधारण पाच ते रात्री आठ या वेळेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी होत आहे. वाहन चालक, व्यापारी, नागरीकांना या कोंडीचा फटका बसत आहे. बैठकीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयाने सहकार्य केले.

‘सकाळ’ची भूमिका
वेगाने वाढणाऱ्या पुणे महानगरात पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविताना सर्वसामान्य पुणेकरांच्या प्राधान्याने विचार झाला पाहिजे. प्रकल्पाच्या नियोजनापासून ते उभारणीपर्यंत नागरीकांना प्राधान्य राहिले तरच प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर वापर सुयोग्य पद्धतीने होऊ शकतो. प्रकल्प झाले पाहिजेत; मात्र ते पुणेकरांच्या गरजा लक्षात घेऊन, ही भूमिका आहे. जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे ज्येष्ठ नागरिक-शाळकरी मुले-मुली, महिला, कोंडीत अडकलेले वाहन चालक हे चित्र पुण्याला शोभा देणारे नाही. त्यामुळे, उड्डाणपूल बांधणार असून, तर ते उत्तम वापरात आले पाहिजेतच. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरी संघटनांनी पुण्याला प्राधान्य देत एकत्र आले पाहिजे. पुणेकर म्हणून आपल्याला अशा प्रकल्पांमध्ये काही सूचना करायच्या असतील, तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.
Email: editor.pune@esakal.com
व्हॉट्सॲप क्रमांक ः ८४८४९७३६०२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60179 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top