अतिरिक्त आयुक्तपदी कानडे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिरिक्त आयुक्तपदी कानडे यांची निवड
अतिरिक्त आयुक्तपदी कानडे यांची निवड

अतिरिक्त आयुक्तपदी कानडे यांची निवड

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : राज्य शासनाने मिळकतकर विभागाचे प्रमुख व सहआयुक्त विलास कानडे यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवड केली. ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर कानडे यांना बढती दिली आहे.
पुणे महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा आहेत, त्यापैकी दोन ठिकाणी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, तर एका अतिरिक्त आयुक्तपद महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. राज्य सरकारने जकात रद्द करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तेव्हा जकात विभाग प्रमुख असलेल्या विलास कानडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही सतत संवाद व चर्चा करून त्यांनी एलबीटीची यशस्वी अंमलबजावणी केली. एलबीटीमध्ये कानडे यांनी सर्वोच्च उत्पन्न मिळाल्याने आता जीएसटीचा निधी मोठा मिळत आहे. तसेच मिळकतकर विभागातही सर्वोच्च उत्पन्न त्यांच्या कालावधीतच प्राप्त झाले आहे.
विभागीय उपायुक्त, सहायक आयुक्त म्हणून ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथे महापालिकेच्या हिताचा विचार केला. जकात, एलबीटी आणि मिळकतकर या तिन्ही कर प्रणालीत काम करता आले. आता अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारीही त्याच क्षमतेने पार पाडली जाईल, असे निवडीनंतर अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी सांगितले.

62171

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60190 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top