पुण्यात वर्षभरात नवीन पावणेदोन लाख वीजजोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Connection
पुण्यात वर्षभरात नवीन पावणेदोन लाख वीजजोड

पुण्यात वर्षभरात नवीन पावणेदोन लाख वीजजोड

पुणे - पुणे परिमंडलामध्ये गेल्या वर्षभरात (२०२१-२२) १ लाख ८३ हजार ७८३ नवीन वीजजोडण्या (Electricity Connection) कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा महावितरणकडून (Mahavitran) करण्यात आला आहे. त्यामध्ये १ लाख ५२ हजार ७५३ घरगुती वीजजोडण्यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २०२०-२१ मध्ये कठोर लॉकडाऊन होता. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यासाठी मर्यादा आल्या होत्या. पहिल्या लाटेचा जोर ओसरताच नोव्हेंबर २०२० नंतर नवीन वीजजोडण्या देण्यास गती देण्यात आली. मार्च २०२१ अखेर १ लाख ९ हजार १९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून २०२१ पर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असल्याने नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग मंदावला होता.

नवीन वीजजोडण्या (२०२१-२२)

- घरगुती - १ लाख ५२ हजार ७५३

- वाणिज्यक - २१ हजार ३५

- औद्योगिक - ३२७१

- कृषी - ५०६९

- इतर - १६५५

पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्हा

- पुणे शहरामध्ये घरगुती- ६६ हजार ८३७, वाणिज्यक- ९६८८, औद्योगिक- ७७१, कृषी- ६१ व इतर ४६२ अशा एकूण ७७ हजार ८१९ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

- पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरगुती- ३७ हजार ६०८, वाणिज्यक- ५१५६, औद्योगिक- ९९८, कृषी- १३२ व इतर ४९२ अशा एकूण ४४ हजार ३८६ वीजजोडण्या

- मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांसह हवेली ग्रामीणमध्ये घरगुती- ४८ हजार ३०८, वाणिज्यक- ६१९१, औद्योगिक- १५०२, कृषी- ४८७६ व इतर ७०१ अशा एकूण ६१ हजार ५७८ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60194 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top