कार मध्ये बिघाड झाल्याचे सांगून द्रुतगती मार्गावर लुटमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार मध्ये बिघाड झाल्याचे सांगून द्रुतगती मार्गावर लुटमार
कार मध्ये बिघाड झाल्याचे सांगून द्रुतगती मार्गावर लुटमार

कार मध्ये बिघाड झाल्याचे सांगून द्रुतगती मार्गावर लुटमार

sakal_logo
By

द्रुतगती मार्गावर लुटमारीची घटना

पुणे, ता. ४ ः मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याला येत असताना दोन अज्ञात व्यक्तीने ‘तुमच्या कारमध्ये बिघाड झाला असल्याचे’ सांगत गाडी थांबवत पैशाची मागणी केली. गाडी दुरुस्तीच्या नावाखाली २१०० रुपयांची मागणी केली असता, ‘इतके पैसे का’ असे विचारल्यावर ‘पैसे देता की, गाडीची काच फोडू’ असे धमकावत पैसे हिसकावून नेल्याची घटना घडली.

प्रा. सतीश ठिगळे हे मंगळवार (३ मे) रोजी दरडग्रस्त भागाची पाहणी करून पुण्याला परतत असताना. अमृतांजन पुलाजवळ गाडी आल्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. गाडीचे टायर व क्लचप्लेटमध्ये बिघाड झाले असल्याचे सांगितले. बोनेट उघडून २१०० रुपये खर्च असल्याचे त्यांनी सांगितले. ठिगळे यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी त्यास होकार दिला. मात्र बोनेट उघडल्यावर अवघ्या १ ते २ मिनिटांत गाडी दुरुस्त झाल्याचे सांगितले. त्यावेळी ठिगळे यांनी १ मिनिटांत गाडी दुरुस्त केली आणि इतका खर्च कसा काय, असे विचारता ‘पैसे नाही दिले तर कारची काच फोडू’ अशी धमकी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60206 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top