स्मशानभूमी दुर्घटनेतील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी दुर्घटनेतील व्यक्तीचा
 उपचारादरम्यान मृत्यू
स्मशानभूमी दुर्घटनेतील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

स्मशानभूमी दुर्घटनेतील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारावेळी चितेवर पेट्रोल ओतताना आगीचा भडका उडून झालेल्या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकास अटक केली आहे.

अनिल बसण्णा शिंदे (वय ५३) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर गणेश सर्जेराव रणसिंग (वय ४९, रा. वाघोली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीक कांबळे (वय २४, रा. ताडीवाला रस्ता) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक कांबळे यांच्या वडिलांनी ३० एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ससून रुग्णालयातील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचा मृतदेह सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यासाठी कैलास स्मशानभूमीत आणण्यात आला. चितेला अग्नी देत असतानाच गणेश रणसिंग यांनी प्लॅस्टिकच्या कॅनमधील पेट्रोल चितेवर ओतले. त्याचवेळी स्मशानभूमीतील ब्लोअर यंत्रणा सुरू झाली. त्यामुळे आगीचा भडका उडून त्यात जवळच थांबलेले सात ते आठ जण आगीत होरपळले. जखमींना तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शिंदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60211 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top