फुकट्या रेल्वे प्रवाशांना अडीच कोटींचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुकट्या रेल्वे प्रवाशांना अडीच कोटींचा दंड
फुकट्या रेल्वे प्रवाशांना अडीच कोटींचा दंड

फुकट्या रेल्वे प्रवाशांना अडीच कोटींचा दंड

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीदरम्यान ३६ हजार ५७९ प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत सुमारे अडीच कोटींचा रुपयांचा दंड वसूल केला. अनियमित प्रवास करणाऱ्या १०१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार ६२९ रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाणिज्य विभागाची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
ही कारवाई पुणेसह कोल्हापूर, मिरज आदी विविध स्थानकावर तसेच गाड्यामध्ये कारवाई केली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. व्ही.एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. प्रवाशांनी तिकीट न काढता प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60216 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top