कॉसमॉस बॅंकेकडून सभासदांना चार टक्के लाभांश जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉसमॉस बॅंकेकडून सभासदांना चार टक्के लाभांश जाहीर
कॉसमॉस बॅंकेकडून सभासदांना चार टक्के लाभांश जाहीर

कॉसमॉस बॅंकेकडून सभासदांना चार टक्के लाभांश जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : कॉसमॉस को-ऑप. बॅंकेकडून सभासदांना मार्च २०२१ अखेर आर्थिक वर्षासाठी चार टक्के लाभांश जाहीर केला आहे. लाभांशाची रक्कम गुरुवारी (ता. ५) सभासदांच्या खात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.

वाघोली येथील लेक्सीकॉन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि अंबरनाथ येथे लवकरच नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी वाघोली येथील नवीन शाखेमध्ये बॅंकेच्या संचालिका प्रा. राजेश्‍वरी धोत्रे यांच्या हस्ते पूजा झाली. बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उपाध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे, ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, प्रा. नंदकुमार काकिर्डे, मिलिंद पोकळे, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, अंबरनाथ येथील शाखा पनवेलकर प्राइड इमारतीमध्ये असून, संचालक जयंत बर्वे यांच्या हस्ते पूजा झाली. यावेळी संचालक प्रवीणकुमार गांधी, उपमुख्य महाव्यवस्क्षापिका आकांक्षा राणे उपस्थित होत्या. दरम्यान, कॉसमॉस बॅंकेला शिरूर आणि राजगुरुनगर येथेही शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60234 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top