
वीज कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव
पुणे, ता. ५ : पुणे जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या पुणे परिमंडलमधील १३ यंत्रचालक व ४४ तांत्रिक कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गौरविण्यात पुणे परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे ः गोपीनाथ शेळके, अनिल येवले, दत्तात्रेय चव्हाण, मुरलीधर मुठे (बंडगार्डन विभाग), स्वप्नील जगदाळे, सतीश उंडे, एकनाथ साबळे, दिलीप चव्हाण (नगररोड विभाग), तानाजी शेंडकर, किशोर मस्के, उमेश मिसाळ, गणेश बिडवे, (पद्मावती विभाग), पंडित शिंदे, सत्यवान दराडे, सोनाली विश्वकर्मा, चेतन जाधव (पर्वती विभाग), इरफान महम्मद, अजित हांडे, सोमनाथ कळम, विजय भोसले, राहुल आरुडे (रास्तापेठ विभाग), सुभाष जुंबळे, सिद्धांत गणोरकर, ज्ञानेश्वर मते, कृष्णा आरुडे (भोसरी विभाग), शिल्पा जाधव, अंकुश खुडे, श्रीनिवास दौंड, एकनाथ भाकडे (कोथरूड विभाग), अमीर देवर्षी, राहुल चव्हाण, सुरेश पाटोरकर, बद्रिनाथ जाधव (पिंपरी विभाग), अनिल फाळके, सुनील शेळके, सुदर्शन मुंडे, सिद्धेश घुले, (शिवाजीनगर विभाग), सोमनाथ चव्हाण (गणेशखिंड चाचणी), बंडू नांगरे, अमित महाजन, बाळकू कवटे, राजेश आव्हाड, शिवाजी वाघमारे, शिवाजी लोहकरे (मंचर विभाग), उमेश खोमणे, कैलास सरोगदे, सचिन जावळकर, राजेंद्र खरात, संपत चौधरी (मुळशी विभाग), सोमनाथ जंगले, अमृता चौधरी, अवधूत गिरी, रामकृष्ण मांजरे, दिनेश आगळमे, संभाजी येवले, महेश दरेकर (राजगुरुनगर विभाग).
यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, सतीश राजदीप, सहाय्यक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता भागवत थेटे, विजेंद्र मुळे यांची उपस्थिती होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ व दोन्ही चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे अभियंते व कर्मचारी हे सुरळीत वीजपुरवठा ठेवण्याचे कर्तव्य बजावीत आहेत. त्यांचे हे कार्य अभिमानास्पद आहे.
- सचिन तालेवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60271 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..