बावधन कचरा प्रकल्पाविरोधात ‘मानवी साखळी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावधन कचरा प्रकल्पाविरोधात ‘मानवी साखळी’
बावधन कचरा प्रकल्पाविरोधात ‘मानवी साखळी’

बावधन कचरा प्रकल्पाविरोधात ‘मानवी साखळी’

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : पुण्यातील नद्यांच्‍या संवर्धन आणि स्वच्छतेसाठी विविध संस्थांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अशात पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आलेला बावधन कचरा प्रकल्प प्रस्ताव धुडकावून पुन्हा काम सुरू केल्‍यामुळे पर्यावरणप्रेमी ‘मानवी साखळी’च्या माध्यमातून निषेध करणार आहेत. येत्या रविवारी (ता. ८) सकाळी दहा वाजता ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात आले असून चांदणी चौकाकडून भूगाव रस्त्यावरील सुरभी हॉटेल येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने किशोर मोहोळकर, वीरेंद्र चित्राव, अनिल करंजावणे यांनी पत्रकाद्वारे दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60288 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top