
सौरऊर्जा काळाची गरज : डॉ. विजय भटकर
पुणे, ता. ५ : भविष्यातील वाढती विजेची गरज लक्षात घेऊन अपारंपरिक स्रोत म्हणून सौरऊर्जा ही आजच्या काळाची गरज बनली आहे. सध्या कोळशाचा साठा संपत आला आहे. त्यापासून निर्माण होणारे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन व निसर्गावर होणारे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे सौरऊर्जा ही मानवजातीसाठी वरदान ठरली असल्याचे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
देशातील पहिल्या स्मार्ट सोलर स्ट्रीटलाइट सिस्टीमच्या ‘ओलिटो’चे लोकार्पण डॉ. भटकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी ‘मुक्तांगण’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, ‘महाऊर्जा’चे वरिष्ठ अधिकारी जयेंद्र वाढोणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुशील मेढे उपस्थित होते.
मेढे म्हणाले, सौरऊर्जा व निर्मिती क्षेत्रात अनेक नव्या आणि प्रगतशील उत्पादनांचा शोध व निर्मिती सुरू आहे. त्याविषयीची संधी नवीन पिढीसाठी उपलब्ध करून देण्याचा ध्यास फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीने घेतला आहे. अत्याधुनिक वैशिष्ट्ये असलेली स्मार्ट सोलर स्ट्रीटलाईट सिस्टीम हा अभिनव प्रयोग आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष खेडीकर यांना दिवसात दहा पेटंट मिळाले आहेत. त्यामुळे स्मार्ट सोलरवर आणखी संशोधन करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60320 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..