‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन’चा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन’चा वर्धापन दिन उत्साहात
‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन’चा वर्धापन दिन उत्साहात

‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन’चा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ८८ वा वर्धापनदिन नुकताच पार पडला. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावत शुभेच्छांचा वर्षाव केला.
दिवंगत गुरूवर्य शंकरराव कानिटकर आणि त्यांच्या पाच शिक्षक सहकाऱ्यांनी १९३४मध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोसायटीची स्थापना केली. सोसायटीअंतर्गत आज ६२ विद्यालये, महाविद्यालये आहेत. वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात खासदार गिरीश बापट, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पराग संचेती, डॉ. श्रीकांत केळकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. आर. एस. माळी, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते.
डॉ. एकबोटे म्हणाले,‘‘सर्व स्तरातील विद्यार्थी संस्थेची महाविद्यालये, विद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत. संस्था नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पुढे वाटचाल करत आहे. ज्ञानदानातून एक चांगला विद्यार्थी, चांगला नागरिक घडविण्याचा वसा संस्था पुढे नेत आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60325 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top