भावे शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावे शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन
भावे शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन

भावे शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. यानिमित्त शाळेने अशोक हांडे प्रस्तुत ‘मराठी बाणा’ कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला होता. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, कॅप्टन किरण जोशी (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, मुख्याध्यापक अनिल खिलारे तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे प्रास्ताविक तर प्रा. चित्रा नगरकर आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60364 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top