जनसंपर्क विभागाचे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंपर्क विभागाचे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त : पाटील
जनसंपर्क विभागाचे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त : पाटील

जनसंपर्क विभागाचे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त : पाटील

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : ''''राज्यात कोरोनाचे मोठे संकट असतानाही राज्य सरकारने अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यासोबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे पुणे विभागीय प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल'''' असा विश्वास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
सहकारमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे या वेळी उपस्थित होते.
खासदार गिरीश बापट, उल्हास पवार, रमेश बागवे, मोहन जोशी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ‘यशदा’चे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विभागीय पारपत्र अधिकारी अनंत ताकवले यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांसह नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. यशदा येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध सरकारी योजनांची माहिती घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60430 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top