राष्ट्रीय आर्थिक धोरणाने युवकांसमोर आव्हाने ः औचरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय आर्थिक धोरणाने युवकांसमोर आव्हाने ः  औचरे
राष्ट्रीय आर्थिक धोरणाने युवकांसमोर आव्हाने ः औचरे

राष्ट्रीय आर्थिक धोरणाने युवकांसमोर आव्हाने ः औचरे

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः देशात उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण (एलपीजी) या राष्ट्रीय आर्थिक धोरणाने युवकांसमोर नवनवीन आव्हाने उभी केली आहेत. बेरोजगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खासगीकरणामुळे शासकीय नोकरीतील आरक्षण संपुष्टात येणार आहे, असे मत प्रा. डॉ. दशरथ औचरे यांनी व्यक्त केले. दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेतील ३८२ व्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी संघ प्रमुख दादासाहेब सोनवणे, संघ प्रमुख राजू धडे, सुजित रणदिवे, एस. एस. बगाडे, बापू पाटोळे, सुभा लोंढे, गणेश भालेराव, साहेबराव खंडाळे, संतोष माने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60439 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top