एपीजी व एलआयसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीजी व एलआयसी
एपीजी व एलआयसी

एपीजी व एलआयसी

sakal_logo
By

डेटा अॅनालिटिक्स फ्री वेबिनार
पुणे, ता. ५ : डेटा अॅनालिटिक्सद्वारे डेटाचे विश्लेषण करून निष्कर्ष काढला जातो. डेटा ॲनॅलिसिस हे कंपन्यांना त्यांचा वर्क परफॉर्मन्स ऑप्टिमाइझ करण्यात मदत करते. हे अनॅलिसिस व्यवसाय व उद्योगांच्या मॉडेल्सवर लागू केल्यास त्यांना व्यवसाय वाढवण्याचे अधिक कार्यक्षम मार्ग ओळखता येतात. याद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा संचयित करून खर्च कमी करण्याचे व नफा जास्त मिळवण्याचे मार्ग मिळू शकतात. कंपनी चांगले व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी डेटा अॅनालिटिक्स वापरू शकते. त्यामुळे डेटा अॅनालिटिक्स आता सर्वच उद्योग-व्यवसायांमध्ये आहे आणि प्रत्येक संस्था डेटा अनॅलिसिस एक्स्पर्टच्या शोधात आहे. या क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रविवारी (ता. ८) दुपारी दोन वाजता होणाऱ्या विनामूल्य वेबिनारमध्ये सहभागी होण्याची संधी आहे.
नावनोंदणीसाठी क्यूआर कोड : (क्रमांक-------६२१६५)
संपर्क : ७३५०००१६०३

सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

मॉकटेल स्पेशल कार्यशाळा
पुणे, ता. ५ : रस्त्यावरील वाढती गर्दी, ऑफिसमधल्या कामाचा ताण आणि उन्हाचा वाढता पारा या सगळ्यात थोडा थंडावा मिळाला की मूड फ्रेश होतो. या पार्श्वभूमीवर विविध मॉकटेल्स, मिल्कशेक्स, लस्सी व अशा इतर कोल्ड्रिंक्स बनवण्यास शिकवणारी कार्यशाळा १५ मे रोजी होत आहे. यामध्ये पिनाकोलाडा, मँगो ब्लूम, मसाला मोजितो, स्ट्रॉबेरी मँगो पंच, सिंड्रेला, लिची जिंजर आदी प्रकारचे मॉकटेल्स, पंजाबी, आंबा, गुलाब, स्ट्रॉबेरी, केशर पिस्ता आदी प्रकारच्या लस्सी आणि मँगो, बनाना, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, एनर्जी बूस्टर, पान शॉट आदी प्रकारचे मिल्कशेक्स थेट प्रात्यक्षिकांसहित तयार करण्यास शिकविण्यात येणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार रुपये.
संपर्क : ७६६६२३९४८७

डिहायड्रेशन प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा
हिरव्या पालेभाज्यांचे तसेच कांद्यासारख्या नाशवंत पदार्थांचे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) करून भाजीपाला व नाशवंत पदार्थ भरपूर दिवस टिकवता येतात. अशा प्रक्रिया केलेल्या भुकटींना तसेच कच्च्या कांद्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या मुल्यवर्धित उत्पादनांना स्थानिक, परदेशी बाजारांतही वाढती मागणी आहे. डिहायड्रेशन तंत्रज्ञान, त्याची ओळख, फायदे, प्रक्रिया कशी करतात याचे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. ८) आयोजिली आहे. यामध्ये निर्जलीकरण कसे करावे, त्यासाठी आवश्यक बाबी, डिहायड्रेशन तंत्रज्ञान, लागणारी यंत्रसामग्री, व्यवसायाच्या संधी, उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक, घरगुती सोलर ड्रायर, सुक्या भाज्यांची आहार मूल्य, गुणवत्ता, इन्स्टंट मिक्स, पॅकेजिंग, साठवण, विक्री व्यवस्थापन इ.बाबत मार्गदर्शन केले जाईल. प्रक्रिया उदयोजक, विद्यार्थी, गृहिणींसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क २२५० रुपये.
संपर्क : ७६६६२३९४८७

ठिकाण - सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60447 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top