आयुर्वेदाने करा उष्णतेवर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्वेदाने करा उष्णतेवर मात
आयुर्वेदाने करा उष्णतेवर मात

आयुर्वेदाने करा उष्णतेवर मात

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या we are in this together या मोहिमेंतंर्गत व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सौजन्याने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत मार्गदर्शनपर झूम वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. यात ‘आयुर्वेदाने उष्णतेवर मात कशी करावी’ याविषयी शनिवार (ता. ७) दुपारी १२ वाजता प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मालविका तांबे मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. मालविका तांबे यांनी गेली २२ वर्षे वेगवेगळ्या विकारांच्या हजारो रुग्णांवर कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून यशस्वी उपचार केले आहेत. अनेक वर्षांपासून त्या आयुर्वेद आणि सर्वसाधारण आरोग्याबाबत जनजागृती करत आहेत.

याबाबत होणार मार्गदर्शन
सध्या वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे उष्णतेचा त्रास होतो. या वेबिनारच्या माध्यमातून उष्णताजन्य विकार म्हणजे काय?, उष्णताजन्य विकारांचे प्रकार, उष्णताजन्य विकारांच्या वाढीची कारणे, उष्णता कमी करण्यासाठी किंवा उष्णताजन्य विकारांवर आयुर्वेदिक उपचार पद्धती व चिकित्सा आणि योग्य आहारशैली या बाबींवर डॉ. मालविका तांबे प्रामुख्याने मार्गदर्शन करतील.

असे व्हा सहभागी
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक किंवा क्यूआर कोड ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ई-मेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.
PNE22S62174
लिंक : www.waitt.in/register-now/


तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या कार्यशाळा
‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या we are in this together या मोहिमेच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव व एकूणच मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांचे समुपदेशन करण्यासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही २४ तास मोफत हेल्पलाइन मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत या हेल्पलाइनवर राज्यभरातून १३ हजारांहून अधिक लोकांनी संपर्क साधला आहे. तसेच, we are in this together च्या अंतर्गत सातत्याने मानसिक आरोग्याशी निगडित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
: www.waitt.in

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60466 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top