लठ्ठपणामुळे कर्करोगाला आमंत्रण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लठ्ठपणामुळे 
कर्करोगाला आमंत्रण!
लठ्ठपणामुळे कर्करोगाला आमंत्रण!

लठ्ठपणामुळे कर्करोगाला आमंत्रण!

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : तुमचा पोटाचा घेर वाढलाय का? तुम्हाला अॅसिडीटी होते का? आणि तुम्ही वारंवार तळलेले चटपटीत पदार्थ खाता का? या तिन्हींची उत्तरे ‘हो’ असतील तर, आजपासूनच आपली जीवनशैली बदला. आहारात आमूलाग्र बदल करा. कारण, लठ्ठपणा हा आजार भयंकर साथीप्रमाणे वाढत आहे. त्यातून कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
स्थूलता म्हणजे काय?
लठ्ठपणा किंवा स्थूलता हा एक गंभीर आजार आहे. शरीरावर मोठ्या प्रमाणात चरबी (फॅट) साचली जाते. त्यातून वजन वाजते. तसेच, शरीर लठ्ठ होते. त्याला स्थूलता म्हणतात. स्थूलतेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, अर्धांगवायू असे आजार होण्याची शक्यता असते. कर्करोग हा देखिल त्यातून निर्माण होणारा प्राणघातक आजार असल्याची माहिती कर्करोगतज्ज्ञांनी दिली.

संबंध काय?
- आपल्या शरीरात जमा झालेल्या चरबीमुळे काही संप्रेरकांचे स्वरूप बदलते. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर हे प्रमाण वाढते. त्यातून स्तनाचा कर्करोग होतो
- आतड्याच्या इन्शुलिन स्त्रवणारे संप्रेरक असते. त्याचे प्रमाण लठ्ठपणामुळे वाढते. त्यातून आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो
- आपल्या देशात आतापर्यंत महिलांमध्ये (पिअर ओबेसिटी) लठ्ठपणा जास्त आढळत होता. पण, आता तो पुरुषांमध्ये (अॅप्पल ओबेसिटी) वाढत आहे. त्यामुळे आधुनिक काळात स्त्रि आणि पुरुषांमध्ये स्थूलतेमुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण कर्करोगतज्ज्ञांनी टिपले आहे
- स्त्रियांमध्ये घरकामाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पुरुषांमध्ये एकाच जागी तासनतास बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे लठ्ठपणा वाढत आहे.
- स्थूलता असणाऱ्या रुग्णांमध्ये अॅसिटीडी वाढते. त्यामुळे अन्ननलिकाला सातत्याने या अॅसिडशी संपर्क येतो. त्यातून कर्करोगाची शक्यता वाढते.

लठ्ठपणामुळे वाढणारे कर्करोग
- मोठ्या आतड्याचा
- स्तनाचा
- अन्ननलिकेचा
- गर्भाशयाचा
- मूत्रपिंडाचा

पुढे काय होईल?
- अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे लठ्ठपणा वाढतो. हे लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्याचा थेट परिणाम पुढील तेरा वर्षांमध्ये म्हणजे, २०३५ पर्यंत लठ्ठपणा हे कर्करोगाचे प्रमुख कारण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- धूम्रपानाच्या दुष्परिणामांची स्पष्ट जाणीव आता झाली आहे. त्यामुळे त्यातून होणारे कर्करोगाचे प्रमाण कमी होईल. पण, पाश्चात्त्य आहार पद्धतीच्या प्रभावामुळे आपली आहारशैली बदलली आहे. त्यातून पौगंडावस्थेतच स्थूलता वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे स्थूलतेमुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण वाढण्याचा धोका सातत्याने वाढत आहे.

असा करा प्रतिबंध
- आठवड्यातून चार तास म्हणजे दिवसाला सरासरी अर्धा तास व्यायामाला द्या. त्यातून स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होईल.
- घरामध्ये अंगमेहनतीचे काम करून शरीरातील चरबी कमी करता येते
- आठवड्यातून चार तासाच्या वर आणि एक तास व्यायाम वाढविल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका सहा टक्क्यांनी कमी होतो.
- व्यायामामुळे संप्रेरकांचे संतुलन होते
- १२ ते २२ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी नियमित व्यायाम केल्यास त्यांच्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.

कर्करोगाची प्रमुख कारणे

- धूम्रपान
- अल्कोहोल
- लठ्ठपणा
- चुकीचा आहार
- अयोग्य जीवनशैली

आपल्या देशात यापूर्वी धूम्रपान, मद्यपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण जास्त होते. आता जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे कर्करोग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी नियमित व्यायाम हे प्रभावी साधन आहे. आपण किती वेळ आणि कसा व्यायाम करतो, यावर प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे. आठवड्यातून किमान चार तास हृदयाचे ठोके दीड पट वाढेपर्यंत व्यायाम करा.
- डॉ. सुमीत शहा, प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60473 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top