भारतीय स्टेट बँकेतर्फे ग्राहकांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय स्टेट बँकेतर्फे ग्राहकांना मार्गदर्शन
भारतीय स्टेट बँकेतर्फे ग्राहकांना मार्गदर्शन

भारतीय स्टेट बँकेतर्फे ग्राहकांना मार्गदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : भारतीय स्टेट बँकेच्या येथील तिन्ही क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयांतर्फे ‘आझादी का अमृत महोस्तव’ अंतर्गत तीन वेगवेगळ्या ठिकाणी स्टेट बँकेच्या मान्यवर ग्राहकांबरोबर टाऊन हॉल बैठकीचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते.
पुणे पूर्वेच्या बैठकीमध्ये प्रशासकीय कार्यालयातील उप महाव्यवस्थापक जगन्नाथ साहू यांनी मार्गदर्शन केले. पुणे पश्चिमेच्या बैठकीमध्ये प्रशासकीय कार्यालयातील मुख्य व्यवस्थापक अविनाश कुमार आणि क्षेत्रीय व्यवस्थापक हरेराम सिंह यांनी मार्गदर्शन केले. तर पुणे ग्रामीणच्या बैठकीत प्रशासकीय कार्यालयातील सहायक महाव्यवस्थापक अमिताभ श्रीवास्तव आणि क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयातील क्षेत्रीय व्यवस्थापक जोरा सिंह यांनी मार्गदर्शन केले. या बैठकांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
स्टेट बँकेचे अध्यक्ष तसेच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांचे ग्राहकांना उद्देशून दिलेल्या माहितीपर संदेशाचे व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. सध्याच्या काळात आवश्यक अशा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बँकेचे व्यवहार करताना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी व खबरदारीसंबंधी माहिती दिली. यावेळी आयोजित खुल्या सत्रामध्ये ग्राहकांनी उपस्थित केलेल्या तक्रारी व शंकांचे निरसन करण्यात आले.
या बैठकीच्या आयोजनाची व उपस्थितांच्या आभाराची जबाबदारी अनुक्रमे मुख्य व्यवस्थापक रूपाली रावराणे, पश्चिमचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद नाईक, खडकी शाखेचे मुख्य व्यवस्थापक नीरज गुप्ता यांनी पार पाडली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60535 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top