पुणे महापालिकेत महत्त्वाच्या विभागांमध्ये खांदेपालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिकेत महत्त्वाच्या विभागांमध्ये खांदेपालट
पुणे महापालिकेत महत्त्वाच्या विभागांमध्ये खांदेपालट

पुणे महापालिकेत महत्त्वाच्या विभागांमध्ये खांदेपालट

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : पुणे महापालिकेत दोन महत्त्वाच्या विभागांमध्ये खांदेपालट झाला आहे. मिळकतकर विभागाच्या प्रमुखपदी उपायुक्त अजित देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. तर घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुखपदी आशा राऊत यांची नियुक्ती केल्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून ज्ञानेश्‍वर मोळक हे निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहआयुक्त विलास कानडे यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य शासनाने बुधवारी (ता. ४) काढला. त्यामुळे कानडे यांच्याकडील मिळकतकर विभागाची जागा रिक्त झाली होती.
मिळकतकर विभागाचा कार्यभार पुणे महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांस दिला जाईल असे अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आज आयुक्तांनी काढलेल्या आदेशात घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांना मिळकतकर विभागाचे प्रमुख म्हणून बदली करण्याचे आदेश काढले. तर भांडार विभागाच्या प्रमख आशा राऊत यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे राऊत यांच्याकडे दोन विभागांचा कारभार असणार आहे.

महापालिकेचे अधिकारी साईडट्रॅकच
पुणे महापालिकेच्या सेवेतील काही अधिकाऱ्यांना मिळकतकर किंवा भांडार विभागाचा कार्यभार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र दोन आठवड्यापूर्वी राज्य शासनाकडून महापालिकेत दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आले, त्यांना जबाबदारी देताना आकाशचिन्ह विभाग, निवडणूक शाखा, सेवक वर्ग विभाग या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर दोन विभागाचे खातेप्रमुख बदलले पण त्यातही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा विचार करण्यात आला नाही. केवळ विलास कानडे यांच्याकडील मागासवर्ग कक्ष या विभागाचा अतिरिक्त कार्यभार परिमंडळ तीनचे उपायुक्त जयंत भोसेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60545 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top