पुण्यात उन्हाच्या झळा तापदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात उन्हाच्या झळा तापदायक
पुण्यात उन्हाच्या झळा तापदायक

पुण्यात उन्हाच्या झळा तापदायक

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर आणि परिसरातील कमाल तापमानात घट दिसून आली. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु तापमानातील चढ-उतार असाच कायम राहणार असून पुढील दोन दिवसांमध्ये पारा पुन्हा ४० अंशांच्या घरात पोहोचण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शहरात मंगळवारी ३९.६ अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे ४० अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यात कमाल तापमानाचा पारा मागील दोन दिवसांपूर्वीपर्यंत ४० अंशांच्या दरम्यान नोंदले जात होते. त्यामुळे उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाही लाही झाली होती. अद्याप उन्हाचा ताप कमी झाला नसला तरी गेल्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात घट झाली. मात्र आता उन्हाच्या झळा पुन्हा तापदायक ठरणार आहेत. पुढील चार दिवस म्हणजेच येत्या सोमवारपर्यंत (ता. ९) शहर व परिसरात निरभ्र वातावरण राहणार असून कमाल तापमान ४० ते ४१ अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर मात्र अंशतः ढगाळ वातावरणाची चिन्हे असून कमाल तापमानात पुन्हा घट होण्यास सुरवात होईल. त्यामुळे तापमानातील होत असलेली चढ-उतार आठवडाभर कायम राहणार असून उन्हाचा ताप लोकांना अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60556 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top