फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीला ‘फिक्की’चा पुरस्कार स्मार्ट अर्बन इनोव्हेशन अवॉर्डवर मोहर; स्मार्ट सिटी समिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीला ‘फिक्की’चा पुरस्कार 
स्मार्ट अर्बन इनोव्हेशन अवॉर्डवर मोहर; स्मार्ट सिटी समिट
फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीला ‘फिक्की’चा पुरस्कार स्मार्ट अर्बन इनोव्हेशन अवॉर्डवर मोहर; स्मार्ट सिटी समिट

फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीला ‘फिक्की’चा पुरस्कार स्मार्ट अर्बन इनोव्हेशन अवॉर्डवर मोहर; स्मार्ट सिटी समिट

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : नाशिक, ठाणे आणि पिंपरीचिंचवड शहरासाठी आपत्ती व्यवस्थापनात स्मार्ट इनोव्हेशन करणाऱ्या फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्यावतीने (फिक्की) ‘फॉक्सबेरी’ला ‘स्मार्ट अर्बन इनोव्हेशन अवॉर्ड’ने नुकतेच नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

शहर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद श्रेणीमध्ये हा पुरस्कार ‘फॉक्सबेरी’ला प्रदान करण्यात आला. कोरोनाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी आणीबाणी निर्णय प्रणालीसाठी विकसित केलेल्या प्रकल्पासाठी हा पुरस्कार मिळाल्याची माहिती ‘फॉक्सबेरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित भार्गव यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार यांनी हा पुरस्कार जाहीर केला.
फिक्कीच्यावतीने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी समिटमध्ये हा पुरस्कार समारंभ पार पडला. या वेळी फिक्कीच्या अर्बन ट्रान्सफॉर्मेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ. ओ. पी. अग्रवाल, एल ॲण्ड टीच्या स्मार्ट वर्ल्ड आणि कम्युनिकेशन डिजिटल व्यवसाय प्रमुख बालसुब्रमण्यम षणमुगाकुमार आदी उपस्थित होते.

सार्वजनिक समस्यांच्या व्यवस्थापनासाठी सरकारला अचूक माहिती व विदा आधारित धोरणांची आवश्यकता असते. फॉक्सबेरी कंपनी डिसिजन सपोर्ट सिस्टिम अर्थात निर्णय समर्थन प्रणाली व्हिज्युअलाइज्ड अपडेटेड डेटा देते. त्यामुळे प्रशासनाला जलद आणि प्रभावी निर्णय घेण्यास मदत होते. बॅरिकेड्स पोझिशनिंग, इन्फेक्शन ट्रेसिंग, ट्रेंड अ‍ॅनालिसिस आदीचे नियोजन करून आपत्ती (कोरोना) व्यवस्थापनास मदत झाली आहे.
-अंकित भार्गव, मुख्य कार्यकारी अधिकारी, फॉक्सबेरी टेक्नॉलॉजी

62699

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60563 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top