
‘हायस्पीड रेल’चा आराखडा तयार
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॅरिडोअरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा (डीपीआर) सल्लागार कंपनीकडून भारतीय हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला नुकताच सादर झाला आहे. त्यामुळे कॉर्पोरेशनकडून त्यांची छाननी करून लवकरच हा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने देशभरात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. मागील आठवड्यात रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गास ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्या पाठोपाठ आता हा रेल्वे मार्गाला मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर त्या मार्गाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रकल्पाच्या ठळक बाबी
- प्रकल्पाचा अंदाजे १४००० कोटी खर्च
- बुलेट ट्रेनचे रूळ हे स्टॅण्डर्ड गेज असणार
- २२० ते ३५० प्रतिकिलोमीटर या वेगाने धावणार
- प्रवासी क्षमता ७५० असणार आहे
- भूकंप झाल्यास आपोआप ब्रेकिंगसाठी तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टम (यूपीएडीएएस)
- काही मार्ग इलेव्हेटेड तर काही भार्ग भुयारी असणार
- ही ट्रेन ताशी २५० ते ३२० या वेगाने धावणार
- मुंबई ते हैदराबाद सुमारे ७११ किलोमीटर अंतर
- हे अंतर ही ट्रेन साडेतीन तासांत कापणार
- ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे
- या रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रक टाकण्यात येणार
मार्गाबाबत
- या रेल्वेचा मार्ग मोठ्या प्रमाणावर पीएमआरडीएच्या हद्दीतून जातो
- लोणावळ्यापासून पुणे, सासवड या हद्दीतून जातो
- पीएमआरडीच्या विकास आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला नव्हता
- तो समाविष्ट करावा, यासाठी हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने पीएमआरडीएला पत्र दिले होते
- त्याची दखल घेऊन पीएमआरडीएने प्रस्तावित विकास आराखड्यात हा मार्ग दर्शविण्यात आला
प्रशासकीय स्तरावर
- मार्ग पुणे शहरात २०१७ मध्ये महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील फुरसुंगी आणि लोहगावची नवीन हद्दीतून जातो
- फुरसुंगी येथे महापालिकेडून दोन नगररचना योजना (टीपी स्कीम) प्रस्तावित करण्यात आली आहे
- त्यापैकी एका नगररचना योजनेचे प्रारूप महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे
- फुरसुंगीमधील दुसऱ्या नगररचना योजनेचे काम अद्याप सुरू
- ही दोन गावे वगळता उर्वरित गावांचा विकास आराखड्याचे काम महापालिकेकडून अंतिम टप्प्यात
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60567 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..