‘श्रीराम करुणालहरीं’चे सुरेल सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘श्रीराम करुणालहरीं’चे सुरेल सादरीकरण
‘श्रीराम करुणालहरीं’चे सुरेल सादरीकरण

‘श्रीराम करुणालहरीं’चे सुरेल सादरीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘श्रीराम करुणालहरीं’चे सादरीकरण आणि विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या निरुपणाचे आयोजन करण्यात आले होते. वसंत ठकार फाउंडेशन आणि कलावर्धिनी फाउंडेशनच्या वतीने मयूर कॉलनीतील एमईएस बालशिक्षण मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी ‘श्रीरामा करुणानिधे करि कृपा दीनावरी सत्वरी’, ‘श्रीरामा तव मूर्ति बा सतत ती माझ्या वसो अंतरी’ या रचना सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाची संकल्पना लीनता वझे यांची तर, निर्मिती ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास यांची आहे. मिलिंद गुणे, श्रुती वझे, जयदीप वैद्य, शर्वरी वैद्य या कलाकारांनी श्रीराम करुणालहरी सादर केल्या. त्यांना नीलेश रणदिवे, शुभम उगले, केदार परांजपे, आदित्य आपटे, संदीप कुलकर्णी, राहुल गोळे आदींनी साथसंगत केली. जुई आणि तनया रानडे यांनी नृत्यरचना सादर केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60571 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top