एमपीएससीतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससीतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार
एमपीएससीतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार

एमपीएससीतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळविणाऱ्या उमेदवारांचा सत्कार इन्फिनिटी इंजिनिअरिंग अॅकॅडमीतर्फे करण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाचे माजी सचिव कटराव गायकवाड, अविनाश सुर्वे, राजेंद्र पवार, प्रवीण कोल्हे, अतुल चव्हाण, अनुराधा चव्हाण, गिरीश खेडकर, स्वप्नील भोर आदी उपस्थित होते. या वेळी गायकवाड म्हणाले, ‘‘भावी स्थापत्य अभियंता अधिकारी यांच्या समोर प्रशासनामध्ये विविध आव्हाने असणार आहेत. परंतु जनहित केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम केले तर लोकहिताचे ठरेल.’’ तसेच कोणतेही काम करताना आत्मविश्वासाने काम करण्याचा सल्लाही त्यांना दिला. सूत्रसंचालन जयपाल खेडकर यांनी केले. प्रमोद देशकरी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60575 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top