देशात स्टार्टअपसाठी उत्तम काळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशात स्टार्टअपसाठी उत्तम काळ
देशात स्टार्टअपसाठी उत्तम काळ

देशात स्टार्टअपसाठी उत्तम काळ

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : ''''वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे तब्बल ६५ हजाराहून अधिक स्टार्टअपची नोंद झाली आहे. देशात सध्या स्टार्टअपसाठी उत्तम काळ आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व जमातीतील तरुणांना स्वतःचे स्टार्ट अप सुरू करावेत,'''' असे मत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीच्या पूर्वसंध्येला संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे उद्योजक मिलिंद कांबळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. फाउंडेशनचे राजेश पांडे, संवादचे सुनील महाजन, सीमा कांबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले की, ‘‘अनुसूचित जाती-जमातींच्या चळवळीला संघर्षाची पार्श्वभूमी आहे. मात्र, आम्ही समन्वयातून आर्थिक विकास ही भूमिका स्वीकारली आहे. तसेच तरुणांना नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा. त्याला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, देशात दहा हजार उद्योजकांचे जाळे निर्माण झाले आहे. या उद्योजकांसाठी सात हजार कोटींची खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मुद्रा योजनेतून सात कोटी जणांना वित्तपुरवठा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील एक कोटी पाच लाख सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग अनुसूचित जाती-जमातींचे उद्योजक चालवीत आहेत. ’’
निकिता मोघे यांनी आभार मानले.

62232

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60580 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top