इमारत पुनर्विकासची ‘ड्रीम्स’ करा पूर्ण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारत पुनर्विकासची ‘ड्रीम्स’ करा पूर्ण!
इमारत पुनर्विकासची ‘ड्रीम्स’ करा पूर्ण!

इमारत पुनर्विकासची ‘ड्रीम्स’ करा पूर्ण!

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : शहरातील जुन्या रहिवासी इमारती आणि सोसायटी (सहकारी गृहरचना संस्था) यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत गतीमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी येथील एक स्टार्टअपने तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘ड्रीम्स रिडेव्हलपमेंट’ असे या स्टार्टअपचे नाव आहे.
मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (एमएमसीओई) इनक्युबेशन सेंटर अंतर्गत हे स्टार्टअप कार्यरत आहे. वित्त क्षेत्रातील तब्बल दोन दशकांच्या अनुभवानंतर हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे माजी विद्यार्थी असलेले आणि पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळविणारे सीए एस. लक्ष्मीनारायणन आणि सीए हरिश मेनन यांनी या स्टार्टअपची सुरवात केली.

स्टार्टअपची वैशिष्ट्ये
- सोसायटी पुनर्विकासासाठी तयार करण्यात आलेले भारतातील हे एकमेव तंत्रज्ञान व्यासपीठ
- या माध्यमातून पुनर्विकास प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान, डाटा अ‍ॅनालिटिक्स आणि थेट सुविधेसह गतीमानता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
- या प्रवासाची सुरवात डिसेंबर २०२० झाली
- याची मूळ संकल्पना ही संबंधित सोसायटी ‘फिजिटल’ (फिजिकल+डिजिटल) अनुभव देणे ही आहे
- सोसायटींशी सुरवातीपासूनच प्रत्यक्ष संवाद साधला जात असताना, ‘dreamsredeveloped.com’ या स्वरूपात डिजिटल प्लॅटफॉर्म ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू करण्यात आला
- सध्या शहरातील ४५ हून अधिक सोसायटी, २० हून प्रतिष्ठित विकसक, १५ पेक्षा जास्त वास्तुविशारद या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत
- या सर्वांना विविध कायदा संघटनांकडून प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती कायदेशीर सेवा प्रदान केली जाते

ज्येष्ठ नागरिकांसाठी...
‘ड्रीम्स रिडेव्हलपमेंट’ने आपल्या इतर सहभागींसह आणि इंडियन एक्सिलरेटरच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणूक अर्थात प्री-सीड फंडिंग मिळविली आहे. या गुंतवणुकीचा वापर पुनर्विकास परिसंस्थेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने एक विलक्षण व्यासपीठ तयार करण्यासाठी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेत, सध्याच्या तंत्रज्ञान व्यासपीठात परिवर्तन करण्यासाठी केला जाणार आहे.

अशी सुचली कल्पना
कोथरूड येथील आयडियल कॉलनीत वास्तव्यास असताना स्टार्टअपचे संस्थापक सीए एस. लक्ष्मीनारायणन यांची रहिवासी इमारत २०२० मध्ये पुनर्विकास प्रक्रियेतून जात होती. त्यांच्या सोसायटीला विविध विकसकांनी ४० ते ४५ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाची व्यवहार्यता दिली होती. सीए लक्ष्मीनारायणन यांनी विकसकांच्या प्रस्तावाचा, इमारतीच्या जागेचा, संबंधित नियमांचा सखोल अभ्यास केला आणि यामागील गणिताची उकल केली. हा अभ्यास केल्यावर, नियमांच्या आधारे मागणी करता येण्याजोग्या अतिरिक्त क्षेत्राची गणना करण्यासाठी गणितीय मॉडेल मांडले. यानंतर, विकसकाकडून देण्यात येणारी ऑफर ७५ टक्क्यांपेक्षा जास्त होती, जी पुनर्विकास क्षेत्रातील सर्वात मोठी ऑफर होती. याबाबतची माहिती कळताच पुनर्विकासासाठी इच्छुक असलेल्या आसपासच्या परिसरातील काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांना मार्गदर्शनासाठी विनंती केली. यातूनच हा उपक्रम सुरू करण्याची कल्पना सुचली.

पुनर्विकासासाठी गृहरचना संस्थांना लेखासंबंधी सेवा पुरविण्यासाठी स्टार्टअपने ‘झोहो’ या कंपनीशी करार केला आहे. तर सदनिकाधारक अथवा विकसकाला इमारतीमधील घरांची विक्री करता यावी किंवा ते भाडेतत्वावर देता यावे, यासाठी नो ब्रोकर या कंपनीशी करार करण्यात आला आहे. लॉयर्डतर्फे कायदेविषयक सेवा दिली जाते, तर नव्याने पुनर्विकसित केल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये को-वर्किंग स्पेसेस विकसित करण्यासाठी सीसी अँड को या कंपनीशी करार करण्यात आला आहे.
- एस. लक्ष्मीनारायणन

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60594 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top