पुणे कॉंग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्येच जुंपले वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे कॉंग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्येच जुंपले वाद
पुणे कॉंग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्येच जुंपले वाद

पुणे कॉंग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्येच जुंपले वाद

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी शहर कॉंग्रेसने बैठक बोलविली खरी, परंतु रणनीती ठरण्याऐवजी अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे बैठकीचे रूपांतर वादात झाले. नेत्यांमध्ये रंगलेल्या वादामुळे उपस्थितांनी बैठकीतून काढता पाय घेतला. रणनीती बाजूला राहिली आणि बैठक अखेर संपली.
महापालिका निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसच्या नेत्यांना कोअर कमिटीची बैठक कॉंग्रेस भवनात आज सायंकाळी चार वाजता बोलविल्याचे निरोप गेले. या बैठकीला कोअर कमिटीच्या नेत्यांबरोबरच आजी-माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष अशा सर्वांनीच हजेरी लावली. बैठकीला सुरवातही झाली अन थोड्याच वेळात एका माजी नगरसेवकाने ‘पक्षातील काही नेते भाजपच्या नगरसेवकांना चांगले काम केल्याची जाहीर शाबासकी देत फिरत आहेत,’ अशी तक्रार केली. माजी नगरसेवकांनी नाव न घेता हा आरोप केल्यामुळे तेथून वादाला सुरवात झाली. शहरातील एका ज्येष्ठ नेत्याने हस्तक्षेप करीत थेट नाव न घेता, असे आव्हान त्या माजी नगरसेवकाला देऊन ‘चारचौघात आणि सार्वजनिक कार्यक्रमात आपण कोणाचेही वैयक्तिक कौतुक करतो, ही आपल्या पक्षाची संस्कृती आहे. याचा अर्थ आपण विरोधी पक्षाचे कौतुक करतो, असे नाही,’ अशा शब्दांत सुनावले आणि बैठकीतून उठून निघून गेले.
हा वाद सुरू असताना महापालिकेतील माजी गटनेता आणि एका माजी मंत्र्यांमध्ये जुंपली. माजी गटनेत्यांनी ‘अचानक अशी बैठक कशी बोलविता. लोक बाहेर गावी असतात. बैठकीचा अजेंडा नाही.’ त्याचा राग माजी राज्यमंत्र्याला आला. त्यातून या दोघांमध्ये जुंपली. त्यामुळे अनेकांनी या बैठकीतून काढता पाय घेण्यास सुरवात केली. त्याचवेळी काहींनी एकमेकांना समजविण्याचा प्रयत्न करीत बैठक आटोपती घेतली.

वादाचे कारण काय?
ईदच्या एका कार्यक्रमात माजी मंत्र्याने मध्यवस्तीतील भाजपच्या एक नगरसेविका, तिचे पती आणि राष्ट्रवादीमध्ये असलेल्या एका माजी नगरसेवकाची कॉंग्रेसची नगरसेविका असलेल्या पत्नीचे कौतुक केले. त्याचा राग धरून माजी नगरसेवकाने हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. माजी राज्यमंत्री हाच मुद्दा पकडून ‘तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवता का?,’ असा सवाल करीत त्या नगरसेवकाच्या कुटुंबाचा इतिहासच सर्वांसमोर मांडला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60597 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top